रविवार, १३ जुलै, २०१४

शक्यता( अशीही आणि तशीही) ३

       दुसऱ्या दिवशी  रात्री आम्ही lab  मध्ये गेलो Lab ची  दारे लावून घेत सरिताने कडेकोट बंदोबस्त केला .मग Lab च्या एका  विशिष्ठ कोपऱ्यात ठेवलेला एक चौरस डबा घेउन त्यावरची काही विशिष्ठ  बटण दाबून तिने माझा  हात  धरला दोनच क्षणात आम्ही प्रचंड वेगात भिरभिय्रासारखे फिरलो . मधे काही वेळ गेला असावा ....नक्की अशी कोणतीच जाणीव नव्हती ..आणि मग आम्ही एका खोलीत स्थिरावलो ....आता माझ्याच्याने अगदी राहवेना ..".मला तो box जरा दाखव ग सरिता ....काय केलस तरी काय तू? " सरिताने माझा हात दाबून माझे लक्ष खोलीत प्रत्यक्ष चाललेल्या प्रसंगाकडे वेधले ...मग पहिल्यांदाच माझे लक्ष समोर बसलेल्या दोन व्यक्तिंकडे गेले .परत एकदा आश्चर्याच्या धक्क्याने मी  हादरलो माझाच मला चिमटा काढायची जबरदस्त इच्छा मला झाली बरा सरिताने माझा एक हात घट्ट धरुन ठेवला होता ....कारण खोलीत माझ्यासमोर बसलेल्या दोन व्यक्ति होत्या मी आणि सरिता ! मी बराच राग़ात दिसत  होतो आणि मी सरितावर रागवालो होतो ." सरीता , तू  अस  करावस ? हे संशोधन आपल्या दोघांचे होते. तू  ते फक्त तुझ्या एकटीच्या नावावर , ते ही असे अर्धवट का प्रसिद्ध केलेस ? का?"  सरिता  नेहमी प्रमाणे  एकदम  कूल  होती . शांतपणाने ती म्हणाली , " राहुल , कल्पना माझी  होती . निम्म्यापेक्षा अधिक प्रयोग ही मी केले . मग ? त्यातूनही मी तुला आपल्या दोघांच्या नावावर  'copy right ' घेण्यविषयी विचारले होते . तू  क़ायम टाळाटाळ करत रहिलास .शेवटी परिस्थिती हाताबाहेर जायच्या आधी मी माझ्या नावावर copy right घेतला .आता ते संशोधन माझे आहे . मी ते कसेही प्रसिद्ध करेन ! माझी मर्जी !!"
     "तू  असे करू शकत नाहीस सरिता ! आपल्या इतक्या वर्षांच्या  मैत्रीशी तू अशी गद्दारी करू शकत नाहीस !"
" मी असे केलेय राहुल आता तूच काही करू शकत नाहीस !"तिथला मी हताश होऊन बसलेला पाहताना मला प्रचंड राग येत होता . सरिता असा विश्वासघात करू शकते ? पण , सरिताच मला हे दाखवते आहे . का? मी गोंधळून तिच्याकडे पाहत असतानाच क्षणभर माझा हात सोडून तिने 'त्या' बॉक्स ची बटण दाबली . पुन्हा  एकदा प्रचंड वेगाने भिरभिरत संवेदनाहीन वेळेतून आम्ही एका खोलीत प्रवेश कर्ते झालो .
       तिथे एक छोटीशी conference चालली असावी. त्यातल्या दोन- तीन लोकांना मी ओळखत नव्हतो .पण दोन व्यक्तींना मात्र अगदी चांगलेच ओळखत होतो ! मी आणि सरिता.इथे आम्ही दोघेही हताश होऊन बसलो होतो .आणि ती अनोळखी माणसे माहिती काढून घेण्यासाठी आम्हाला  धमकावत होती !   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा