शनिवार, १७ नोव्हेंबर, २०१२

शक्यता (अशीही आणि तशीही !)

                                     प्रकरण २

                       सरिताच्या वाक्यांनी मी सहा वर्षे मागे गेलो.आमचा S.E.चा वर्ग त्यात चित्रे सरांचा गणिताचा तास.चित्रे सरांना १० मितींवरून खूप पिळले होते आम्ही!"सर तीन मिती दिसतात.चौथी मिती काळ! पण पाचवी ते दहावी मिती कळात नाही! सर, आकृती काढून समजावून सांगा ना" आमच्यामुळे इतरांनाही जणू स्फुरण चढलं होते."आम्हाला समजावून द्यायचच असं चित्रे सरांनीही मनावर घेतला असावं कारण तब्बल दीड तास ते दहा मितांवर बोलत राहिले. आम्ही त्यांना पिळल कि त्यांनी आम्हाला कोण जाने पण मजा आली! नंतर कित्येक दिवस आम्ही एकमेकांना चिडवायचो ,"काय कोणत्या मितीत हिंडत आहात सध्या!" किंवा "ए  त्रास  नका  देऊ  रे... नाहीतर  मंडळी ४थ्या मितीतून ५ व्या मितीत पोहोचतील वगैरे..वगैरे..
                      नंतर बाकीचांच्या  डोक्यातून ती कल्पना हद्दपार झाली पण माझ्या आणि सरिताच्या डोक्यात मात्र ती ठाण मांडून बसली होती.आम्ही  त्यावरची मिळतील तेव्हढी पुस्तके,पेपर्स, माहिती वाचली. इतकेच नव्हे  तर आमचे  दोन्ही प्रोजेक्ट्स पण याच विषयावर होते!आत्ताही आमचे संशोधन अशाच काही प्रकारचे होते.मितीतील समांतर जगात जाण्याची पोर्टल्स शोधायचे काम सरिता करत होती तर त्यांची गणिती संभावना मी शोधत होतो.थोडक्यात सरिता नेहमीप्रमाणे PRACTICAL होती तर मी तत्त्वज्ञांनी!
                   मी भावनातिरेकाने तिचे हात धरले ,"सरिता अगं, कसलं जबरदस्त संशोधन आहे गं!मी क्षणात ६ वर्ष मागे जाऊन IIT त पोचलो!! मला गदागदा हलवून तिने माझ्या स्वप्नारांजानातून मला जागं केलं
"राहुल..कधीतरी चेष्टा करणं सोडून गंभीर हो!" इतका वेळ शांतपणाच्या  मुखवट्याखाली  दडलेलं  तिचं  टेन्शन मला आता जाणवलं! "OK! मग आता तू  सांग.तुझं संशोधन पूर्ण झालं ? मला  न  सांगता  अचानक  अशी का आणि कुठे गेली होतीस?" "मला तुला जे काही सांगायचं आणि दाखवायचं आहे त्यासाठी मला तुझे ३ ते ४ दिवस हवेत!" थोडक्यात   म्हणजे  मी  फक्त  योग्य  वेळेची  वाट  पहायची.... त्या  आधी  मादाम काहीही  सांगणार नाहीत आणि आता बाकी सर्व विचार सोडून मला प्लानिंग  करायला  हवे. आता  ती म्हणते तसं  तिला आणि मलाही तीन चार दिवसांसाठी गायब व्हायचं असेल तर त्याला प्लानिंग नको?
            तास दीड तासांच्या अथक प्रयत्नांनंतर मला हव तसं 'फुल प्रूफ' प्लानिंग  झालं. माझे व सरिताचे  पालक  मुंबईला स्थायिक होते. परंतु  तिच्या गायब होण्याच्या प्रकाराने तिचे बाबा बंगलोरला आले होते.  कोणालाही  काहीही उलगडून सांगायला वा विश्वासात घ्यायला सरिता तयार  नव्हती. त्यामुळे  सरिताच्या  गायब होण्यामागे तिचे आणि माझे संशोधनातील वाद कारणीभूत ठरले . आता ते संशोधन पूर्ण करण्यासाठी आम्ही काही दिवस बाहेरगावी जातो आहोत या आमच्या सांगण्यावर त्यांना विश्वास  ठेवावाच लागला.एकदा पोलिसांच्या समोर हजेरी लावल्यावर बाकीची कायदेशीर कारवाई सुद्धा सरिताच्या बाबांवर येऊन पडली.
         LAB मध्ये माझ्या बाबांना हृदयविकाराने आजारी पडावे लागले. रजेचे  काम  तर  झाले... अगदी  परतायला उशीर झाला तरी चालून जाईल इतके बेमालूम झाले.नाही म्हणायला काही जवळच्या मित्रांच्या  नजरांनी खुणावलं पण या बाबतीत सरीतासमोर आपली पुरी शरणागती होती! त्यानाही योग्य वेळ येई  पर्यंत थांबावे लागणार होते. सर्व काही मी व सरीतानी एकमतानी केलं पण माझ्या एका प्रश्नाबाबत  मात्र आमचे एकमत नव्हते. कुठे   काही  CALCULATION  चुकले आणि परत येणे लांबले अथवा परत  येणे जमलेच नाही तर? या माझ्या प्रश्नांवर "आपण चार दिवसात परत येऊ" हे पालुपद तिने चालूच  ठेवले.
तिला ह्या प्रयोगाबद्दल सॉलिड विश्वास होता कि ती माझ्यापासून काही लपवत होती? पण काय? आणि का?  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा