शनिवार, १७ नोव्हेंबर, २०१२

शक्यता (अशीही आणि तशीही !)

                                    प्रकरण १


           गुरूवारी सकाळी सात साडे सातची वेळ . मी मस्त साखर झोपेत होतो. तीन  दिवसांच्या  ताणामुळे आणि जागरणामुळे उठायचा  अजीबात 'मूड' नव्हता . आणि ... दारावरची बेल वाजली. मी नेहेमी प्रमाणे दुर्लक्ष्य केले. पण माझी हि आळशी पणाची सवय माहिती असल्यासारखी १० सेकंदात ती परत वाजली.चडफडत मी दार उघडायला उठलोच. खरतर नेहमी बेल वाजवणारा जाण्याची वाट बघणारा मी तिसऱ्यांदा बेल  वाजायच्या  आत  दारापाशी  पोहोचलो सुद्धा ! बाहेरची व्यक्ती मला भेटल्याशिवाय जाणार नाही हि अन्तःप्रेरणा बहुधा मला आधीच झाली होती!
           पण एव्हढा मोठा धक्का मी अपेक्षिला नव्हता! दारात ती उभी होती!मी दर परत बंद केले ... ती? मी स्वप्नात तर नाही न? परत एकदा बेल वाजली . दर उघडले तर दारात खरच तीच होती! सरिता !! मी मलाच एका चिमटा काढला ; आणि कळवळून ओरडलो ,"सरिता तू? "
            "शू.." तिन मला गप्पा करत आत ढकललं आणि स्वतः आत येऊन दर लावलं. तिला पाहताच बधीर झालेल्या माझ्या डोक्यानं आता काम सुरु केल होतं. तिला विचारायचे साधारण ४२० प्रश्न माझ्या मनात तयार होत होते पण तोंडाने  असहकार पुकारला होता. त्याने वसलेला 'आ' बंदच होत नव्हता.
           "राहुल, अरे ओरडतोस काय? 'आ' काय वासतोस ? भूत पाहिल्यासारखं? मी सरिता आहे!" बस.. हीच सरिताची खासियत आहे! कुठल्याही प्रसंगात एकदम 'कूल' असते ही! तीन  दिवसांपूर्वी  बेपत्ता  होऊन  या बाईने एव्हढा गोंधळ  घातला  आहे  हे  हिच्या  या  शांत  उद्गारांवरून  लक्षात  तरी  येईल  का!  "O.M.G.S."एव्हढंच बोलू शकलो मी! "ए आळश्या, एवढी तीन दिवसांनी भेटतेय,किमान आत्ता तरी 'OH MY GOD SARITA!' हे वाक्य तरी पूर्ण बोल की! हं? " या सारीतासमोर काय बोलावं हेच मला सुचेना!
          "कुठे होतात मादाम तुम्ही इतके दिवस?" अस्मादिकांना हळूहळू वाचा फुटू लागली."सगळ्यात आधी गरमा गरम चहा पाज,मग बोलू... एकटाच घरात आहेस न?अर्थात तशीच वेळ साधून आलेय मी!" अजूनही बधीरावस्थेत असल्यामुळे यंत्रवत चालत मी स्वयंपाक घरात पोहोचलो.पाठोपाठ सरिता आलीच. ते बरंच झालं म्हणा, कारण स्वयंपाकघरात कोणती वस्तू कोठे सापडते आणि त्याचे पुढे काय करायचे असते याची अस्मादिकांना बिलकुल कल्पना नव्हती! सरिता मला माझ्यापेक्षा जास्त ओळखत असल्याने एव्हाना ती चहा करण्याच्या खटपटीला लागली होती. मी मात्र अजूनही  मुखास्तम्भासारखा उभा होतो! या  समोरच्या  व्यक्तीला आपण  पूर्णत्वाने ओळखतो असा माझा गैरसमज  होता.जो या 'सरिता' नामक 'रसायनाने ' अगदी चटके देऊन दूर केला होता!
            मी आणि सरिता ११ वी पासून एकाच GROUP मधे. मी ,सरिता, अव्या, रवी आणि चित्रा ! आमचा पाच जणांचा GROUP. अति हुशारआणि  अतिदंगेखोर असा आमचा लौकिक! कायम काहीतरी नवीन कड्या करायचो आम्ही पाच जणं . त्यावेळी आमचं एकच तत्त्व होतं -अभ्यास परीक्षेच्या आधी फक्त महिनाभर...बाकी सर्व वेळ FULL TO धमाल ! वेगवेगळ्या स्पर्धा , प्रोजेक्ट्स ...भलभलत्या विषयावर वाद- विवाद, चर्चा आणि बराच काही! वर्गात  प्रोफेसर्सना   त्रास  देण्यात आमचा पहिला नंबर! आम्ही तासाला बंक मारला कीच प्रोफेसर आमच्यावर खुश असायचे.
          शास्त्रज्ञ व्हायचं हे आमचं अगदी १२ वी पासून ठरलेलं .त्यामुळे IIT तून M .TECH  होईपर्यंत आम्ही एकत्र होतो! त्यानंतर मात्र आमच्या वाटा बदलल्या.मी आणि सरिता 'JUNIOR SCIENTITS' म्हणून IISE बंगलोरला आलो तर इतर तिघे आपापल्या वाटांनी अमेरिकेत गेले. पण तब्बल ९ वर्षे एकत्र राहूनही'ह्या सरिताला मी ओळखत नव्हतो!
           "अरे चहा घेना!"  बहुधा हे वाक्य सरिता तिसऱ्यांदा म्हणत होती. मी पट्कन तिच्या हातातून चहा घेतला. रागावून एकदम नाहीशी झाली तर मिळणारा चहाही जायचा! "मी  कुठेही गायब होत नाही. आणि झालेच गायब तरी तुझा हा आयता  मिळणारा चहा कुठेही घेऊन जात नाही!"
मनातले विचार काळात असल्यासारखे ती बोलली. मी संशयाने तिच्याकडे पहिले. "काय यार राहुल, तुझ्या  मनातले 'हे'  विचार कळायला मला कुठल्याही मशीन व सिद्धी ची आवश्यकता का भासेल? तब्बल ९ वर्ष  ओळखते तुला मी!" "पण मी मात्र तुला बिलकुल ओळखत नाही. कुठे गायब झाली होतीस तेही तब्बल  तीन दिवस?" मी म्हणालो."ओळख! तुला तर ओळखता आलच पाहिजे! रवी,अव्या,चित्रा सगळ्यांनी ओळखलं!" कपातून चहाचा घोट घेत सरिता बोलली.
             "तू रवी,अव्या आणि चित्राला भेटून आलीस?" मी अवाक! मनात  हिशोब करतोय..... इथून  अमेरिकेला जायला २ दिवस, तिघेही वेगवेगळ्या ठिकाणी! प्रत्येकात साधारण ८०० ते २००० मैलांचं  अंतर..... १/१ दिवस प्रत्येकाला भेटायला धरला आणि परत यायचे २ दिवस... मग  तीनच  दिवसात  एव्हढा प्रवास कसा काय केलान हिने? विमान कार या नेहमीच्या वाहनांनी शक्यच नाही..शिवाय व्हिसाचं काय?आणि हिला तिकडेच जायचं होतं तर  सर्वाना सांगून का नाही गेली? इतका गोंधळ घालायची काय आवश्यकता होती?हि गायब झाल्याचं मी रवी,अव्या,चित्रा तिघांनाही बोललो होतो की! ते  तिघेही  साले  बोलले नाहीत हि भेटून गेल्याचं! नाही काहीतरी लोचा आहे.. काय? काय? माझी  हि घालमेल बघत  सरिता  शांतपणान समोर उभी! "काय?पेटतेय का काही टयूब लाईट? "
              TIME TRAVEL? MATTER ENERGY CONVERSION? STAR TREK सारखं ...ZAAAAP !पण मला न कळता? शक्य नाही... मग? मी वाईल्ड गेसेस करतोय...मग? "मग? DIMENSIONS.... मिती!माणूस वेगवेगळ्या मितीत प्रवास करू शकतो....विसरलास?" सरिताचा प्रश्न ऐकून मी  भानावर  आलो.. इतका वेळ मी जोरात बोलत होतो कि मनातल्या मनात याचीही शुद्ध मला राहिली नव्हती आणि तिच्या प्रश्नाने  तर ती पूर्णच हरपली!
           

         

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा