गुरुवार, २ जुलै, २००९

मला लिहायला खुप आवडते .माझ्या लिखाणाच्या अनेक छटा दाखवायला आणि परत परत अनुभवायला मिळाव्यात म्हणुन हा लेखन प्रपन्च!
आज पहिली पोस्ट लोकसत्तातिल हास्यरंग कवितापुर्ती स्पर्धेसाठी लिहिलेल्या कवितांपासुन!
(१) तू भिजालिस पावसात
माझ्याकडे छत्री नाही
असुनही उपयोग झाला असता
याची काही खात्री नाही
भासत असलीस जवळ तरी
तू माझ्या जवळ नाहीस
मी तुझ्याजवळ आहे हे
दिवास्वप्नच वास्तव नाही
भिजते आहेस तू फक्त
कृत्रिम पावसात टी.व्ही .च्या पडद्यावर
मी तुला पाहतो आहे
दिवाणखाण्यात बसून सोफ्यावर!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा